तुम्हाला माहिती आहेच की, अनेक व्यक्ती मुलींना ओझं मानतात, त्यांच्याविरुद्ध भ्रूणहत्या करतात आणि त्यांना पुढील शिक्षण घेण्यापासून रोखतात.

माझी कन्या भाग्यश्री योजना

या समस्यांना लक्षात घेऊन , महाराष्ट्र सरकारने महिलांची संख्या वाढवण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना  सुरू केली. 

ही योजना  स्त्रियांची संख्या वाढवण्यासाठी, लिंग निर्धारण  आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी लागू करण्यात आली आहे. 

या योजनेचा  फायदा एका घरातील दोन मुलींना होईल.

ह्या योजने अंतर्गत अशा आई वडिलांना मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत नसबंदी केली तर त्यांना सरकार द्वारा ५०००० रु. दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत, जर पालकांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाचा स्वीकार केला तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे 25,000 रुपये बँकेत जमा केले जातील.

 महाराष्ट्रातील 7.5 लाख वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.

मुलगी सहा वर्षांची झाल्यावर आणि पुन्हा बारा वर्षांची झाल्यावर तिला व्याजाचे पैसे मिळतील. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला संपूर्ण रकमेचा हक्क मिळेल. 

माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत, प्राप्तकर्ता मुलगी आणि तिच्या आईच्या नावावर नॅशनल बँकेत संयुक्त खाते तयार केले जाईल आणि दोघांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल.

योजनेच्या लाभांसाठी अर्ज करताना मुलीच्या जन्म नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनासाठी अर्ज कसा कराल?