Ration Card Name Add Online Maharashtra 2026 | रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडायचे?

Ration Card Name Add Online Maharashtra 2026 : नमस्कार मित्रांनो,आजच्या डिजिटल युगात रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी तहसील कार्यालयात रांगा लावण्याची गरज उरलेली नाही. महाराष्ट्र शासनाच्या RCMS MahaFood (Public Login) प्रणालीमुळे तुम्ही ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन पूर्ण करू शकता. या सविस्तर मार्गदर्शिकेत आपण A to Z सर्व स्टेप्स, लागणारी कागदपत्रे, कॉमन चुका, अर्जाचा स्टेटस, कालावधी आणि महत्वाच्या सूचना पाहणार आहोत.


Table of Contents

रेशन कार्ड म्हणजे काय?

रेशन कार्ड हा भारत सरकारचा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज असून त्याच्या आधारे नागरिकांना स्वस्त धान्य (गहू, तांदूळ, साखर इ.) मिळते. तसेच रेशन कार्डचा उपयोग ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो.


रेशन कार्डमध्ये नवीन नाव का जोडावे?

खालील कारणांसाठी रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडणे आवश्यक ठरते:

  • लग्नानंतर पत्नीचे नाव जोडण्यासाठी
  • नवजात बाळाचे नाव जोडण्यासाठी
  • कुटुंबात नवीन सदस्य सामील झाल्यास
  • स्थलांतर (Transfer) झाल्यानंतर
  • आधी नाव नोंदणी राहिलेली असल्यास

रेशन कार्डमध्ये नाव कोण जोडू शकतो?

⚠️ महत्वाचे:
रेशन कार्डमध्ये नाव फक्त Head of Family (HOF) म्हणजेच ज्या व्यक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे, त्यांच्याच Aadhaar Number + Mobile Number वापरून जोडता येते. इतर कुणाचाही आधार नंबर वापरून नाव ॲड करता येत नाही.


रेशन कार्डमध्ये नाव जोडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

नवीन सदस्याच्या प्रकारानुसार खालीलपैकी कोणतेही एक-दोन कागदपत्रे लागतात:

  • Aadhaar Card
  • Birth Certificate (लहान मुलांसाठी)
  • Marriage Certificate (पत्नीचे नाव जोडताना)
  • School Leaving Certificate / Marksheet
  • Voter ID / PAN Card (पर्यायी)
  • Passport Size Photo (Max 20 KB)

📌 सर्व डॉक्युमेंट्स PDF format मध्ये (Max 20 KB) असावीत.


RCMS MahaFood वेबसाईट कशी उघडायची?

  1. Google ओपन करा
  2. Search करा – RCMS MahaFood
  3. अधिकृत वेबसाईट उघडा – https://rcms.mahafood.gov.in/
  4. Sign In / Register या बटनावर क्लिक करा
  5. येथे दोन पर्याय दिसतील:
    • Office Login
    • Public Login
  6. आपल्याला Public Login मध्ये जायचे आहे

Public Login साठी नवीन अकाउंट कसे तयार करायचे?

जर तुमचं आधी अकाउंट नसेल तर खालील स्टेप्स फॉलो करा:

Step 1: New User निवडा

  • New User या पर्यायावर क्लिक करा
  • पहिला पर्याय सिलेक्ट करा:
    I have valid ration card and I am Head of Family (HOF)

Step 2: Ration Card Number टाका

  • RC Number टाका
  • Check Ration Card वर क्लिक करा
Ration Card Name Add Online Maharashtra 2026

रेशन कार्ड नंबर माहित नसेल तर काय करायचे?

  1. Play Store उघडा
  2. Mera Ration App Install करा
  3. App Open करा → Language Select करा
  4. Guest Start वर क्लिक करा
  5. Head of Family चा Aadhaar Number टाका
  6. OTP Verify करा
  7. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला 12 अंकी Ration Card Number दिसेल

हा नंबर पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक आहे.

Ration Card Name Add Online Maharashtra 2026

Public Login Registration पूर्ण प्रक्रिया

  1. OTP Verify झाल्यानंतर:
    • नाव मराठीत (Local Language)
    • Login ID तयार करा
    • Password सेट करा
    • Mobile Number व Email ID टाका
  2. Captcha टाकून Submit करा
  3. यशस्वी नोंदणी झाल्यावर Congratulations मेसेज दिसेल

Public Login मध्ये लॉगिन कसे करायचे?

  1. Registered User वर क्लिक करा
  2. Head of Family चा Aadhaar Number टाका
  3. OTP Verify करा
  4. Dashboard ओपन होईल

Ration Card Name Add Online Maharashtra 2026 कसे करायचे? (Step-by-Step)

Step 1: Ration Card Modification

  • Dashboard मध्ये Ration Card Modification वर क्लिक करा
  • सध्याचे सर्व सदस्य दिसतील

Step 2: Add Member

  • Add Member या निळ्या बटनावर क्लिक करा

Add Member फॉर्म कसा भरायचा? (Detailed)

1️⃣ फोटो अपलोड

  • Passport Size फोटो
  • Max Size: 20 KB

2️⃣ Member Personal Details

  • Member Name (Marathi – Local Language)
  • Member Name (English – Aadhaar प्रमाणे)
  • Father Name / Mother Name (Marathi + English)
  • Gender
  • Date of Birth (Exact)

3️⃣ Relation Details

  • Head of Family सोबत नातं निवडा (Son/Daughter/Wife/Other)

4️⃣ Aadhaar Details

  • Aadhaar Number अनिवार्य

5️⃣ Occupation & Income

  • Occupation: Employed / Unemployed
  • Annual Income (नसेल तर 0 टाका)

6️⃣ Document Upload

  • Birth Certificate / Aadhaar / Other
  • PDF (Max 20 KB)
  • Document Issue Date

7️⃣ Additional Information

  • MNREGA: Yes / No
  • Caste Category
  • Disability / Critical Illness (असल्यास Yes)

फॉर्म Submit कसा करायचा?

  1. सर्व माहिती तपासून Save करा
  2. “Member Details Insert Successfully” मेसेज दिसेल
  3. खाली जाऊन Confirm & Submit Application (No Fees) वर क्लिक करा

Ration Card Name Add Online Maharashtra 2026 अर्ज सबमिट झाल्यानंतर पुढे काय होते?

  • अर्ज तहसील कार्यालयातील Inspector कडे जातो
  • Application Number Generate होतो
  • Status: Pending
  • साधारणतः 15 ते 30 दिवसांत नाव रेशन कार्डमध्ये जोडले जाते

जर 30 दिवसांत नाव जोडले गेले नाही तर Inspector ला संपर्क करा किंवा Complaint दाखल करा.


Ration Card Name Add Online Maharashtra 2026 कॉमन चुका टाळा (Very Important)

❌ चुकीचा Aadhaar Number टाकणे
❌ फोटो/डॉक्युमेंट जास्त KB मध्ये अपलोड करणे
❌ Head of Family व्यतिरिक्त इतर Aadhaar वापरणे
❌ चुकीची Date of Birth


निष्कर्ष

अशा प्रकारे तुम्ही Ration Card Name Add Online Maharashtra 2026 अंतर्गत रेशन कार्डमध्ये नवीन नाव घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने जोडू शकता. ही सविस्तर माहिती उपयुक्त वाटल्यास लेख Share करा आणि अधिक अशाच अपडेट्ससाठी वेबसाईटला भेट देत रहा.

मित्रांनो, तुम्हाला Ration Card Name Add Online Maharashtra 2026 बद्दल दिलेली माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. Ration Card Name Add Online Maharashtra 2026 लेखाबाबत तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, अशा सरकारी योजनांशी संबंधित अपडेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://yojanaparichay.com/ या वेबसाइटला भेट देत रहा.

धन्यवाद 🙏 | जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

रेशन कार्डमध्ये नवीन नाव कोण जोडू शकतो?

👉 रेशन कार्डमध्ये नवीन नाव फक्त Head of Family (ज्या व्यक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे) तेच जोडू शकतात.

रेशन कार्ड नंबर माहित नसेल तर काय करावे?

👉 Play Store वरील Mera Ration App वापरून आधार नंबरद्वारे रेशन कार्ड नंबर काढता येतो.

मोबाईलवरून रेशन कार्डमध्ये नाव ॲड करता येते का?

👉 होय. मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक कोणत्याही डिव्हाइसवरून अर्ज करता येतो.

30 दिवसांत नाव अपडेट झाले नाही तर काय करावे?

👉 तहसील कार्यालयातील Inspector शी संपर्क साधावा किंवा ऑनलाइन Complaint दाखल करावी.


इतर उपयुक्त योजना

Leave a comment