apaar card online apply 2026 : मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही CET (Common Entrance Test) चा फॉर्म भरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता CET फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार, कोणताही CET फॉर्म भरण्यासाठी APAR Card (ज्याला ABC ID असेही म्हणतात) अनिवार्य करण्यात आले आहे.
महत्त्वाचं म्हणजे, APAAR Card काढण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्ही CET चा ऑनलाईन फॉर्म भरू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.
या लेखामध्ये आपण APAAR Card / ABC ID घरबसल्या मोबाईलवरून कस काढायच, याची A to Z स्टेप-बाय-स्टेप माहिती पाहणार आहोत.
APAAR Card (ABC ID) म्हणजे काय?
APAR Card म्हणजेच Academic Bank of Credits (ABC) ID. ही एक युनिक डिजिटल आयडी आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती सुरक्षित ठेवली जाते. पुढील काळात CET, अॅडमिशन, परीक्षा, कॉलेज प्रवेश अशा अनेक प्रक्रियांसाठी ही आयडी आवश्यक असणार आहे.
CET फॉर्मसाठी APAAR Card का आवश्यक आहे?
- CET फॉर्म भरण्यासाठी आता APAR Card अनिवार्य
- विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित राहते
- फसवणूक टाळण्यासाठी सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय
- भविष्यातील प्रवेश प्रक्रिया सोपी होते
APAAR Card काढण्यासाठी आवश्यक अट
APAR Card काढण्यापूर्वी खालील अट पूर्ण असणे गरजेचे आहे 👇
✔️ तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे
❌ जर मोबाईल नंबर लिंक नसेल, तर OTP येणार नाही आणि APAR Card काढता येणार नाही
Apaar card online apply 2026 कसं करायच ?
खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही Apaar ID / ABC ID घरबसल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
Step 1: DigiLocker App डाउनलोड करा
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store ओपन करा.
- Search बॉक्समध्ये DigiLocker असे टाका.
- भारत सरकारचे अधिकृत DigiLocker App ओळखून Install करा.
- App Install झाल्यानंतर Open बटणावर क्लिक करा.

Step 2: DigiLocker मध्ये लॉगिन / साइन अप करा
- App ओपन केल्यानंतर तुमची Language Select करा (English / Marathi).
- Continue → Next → Let’s Go असे पर्याय सिलेक्ट करा.
- Get Started या पर्यायावर क्लिक करा.
- DigiLocker कडून मागितलेल्या Permissions साठी Allow करा.

Step 3: Aadhaar नंबरने लॉगिन करा
- Try using Aadhaar Number या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा 12 अंकी Aadhaar Number टाका.
- Continue वर क्लिक करा.
- लॉगिनसाठी Aadhaar OTP हा पर्याय निवडा.
- आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
- OTP टाकून Verify करा.
⚠️ महत्वाचे: आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर OTP येणार नाही.

Step 4: DigiLocker Security PIN सेट करा
- OTP Verify झाल्यानंतर तुम्हाला 6 अंकी Security PIN सेट करावा लागेल.
- 123456 किंवा जन्मतारीखसारखा सोपा PIN टाकू नका.
- मजबूत PIN टाकून Confirm / Complete करा.
हा PIN पुढील लॉगिनसाठी उपयोगी पडतो, त्यामुळे लक्षात ठेवा.

Step 5: मोबाईल नंबर Verify करा
- पुढे Enter Mobile Number Manually असा पर्याय दिसेल.
- तुमचा मोबाईल नंबर टाका.
- आलेला OTP टाकून Verify करा.
- DigiLocker ला आवश्यक Permissions देण्यासाठी Allow करा.
Step 6: APAR / ABC ID Search करा
- DigiLocker Dashboard वर गेल्यानंतर Search for Documents या पर्यायावर क्लिक करा.
- Search बॉक्समध्ये APAR किंवा ABC ID असे टाका.
- यादीतून APAR ID / Academic Bank of Credits हा पर्याय सिलेक्ट करा.

Step 7: APAR Card साठी आवश्यक माहिती भरा
APAR ID सिलेक्ट केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये खालील माहिती भरा:
- Name, Date of Birth, Gender – ही माहिती आधारनुसार आपोआप येते.
- Identity Type – Aadhaar सिलेक्ट करा.
- Identity Value – तुमचा Aadhaar Number टाका.
- Admission Type – New Admission
- Admission Year – 2026
- I am – Student
- University / Board Name – तुमची युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड Search करून सिलेक्ट करा.
सर्व माहिती नीट भरल्यानंतर Get Document वर क्लिक करा.

Step 8: APAR Card Generate आणि Download करा
- Get Document वर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ Document Fetching होईल.
- कधी कधी Network मुळे Timeout येऊ शकतो, घाबरू नका.
- पुन्हा एकदा APAR ID वर क्लिक करा.
- काही सेकंदात तुमचा APAR Card / ABC ID Generate होईल.
तुमचा APAR ID Number स्क्रीनवर दिसेल. हा नंबर:
किंवा PDF स्वरूपात Download करा
Screenshot काढून ठेवा

Apaar ID नंबर कसा वापरायचा?
- APAR ID नंबर Screenshot काढून ठेवा
- किंवा PDF Download करा
- हाच नंबर वापरून तुम्ही कोणताही CET फॉर्म घरबसल्या भरू शकता
निष्कर्ष (Conclusion)
मित्रांनो, CET फॉर्म भरण्यासाठी APAAR Card (ABC ID) आता अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने हा APAR Card वेळेत काढून ठेवणे गरजेचे आहे. वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या, मोबाईलवरून, अगदी सोप्या पद्धतीने APAR Card काढू शकता.
मित्रांनो, तुम्हाला Apaar card online apply 2026 बद्दल दिलेली माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. लेखाबाबत तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, अशा सरकारी योजनांशी संबंधित अपडेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://yojanaparichay.com/ या वेबसाइटला भेट देत रहा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
APAR Card म्हणजे काय?
APAR Card म्हणजेच Academic Bank of Credits (ABC ID). यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवले जाते.
APAR Card कोणासाठी आवश्यक आहे?
CET, कॉलेज प्रवेश, विद्यापीठ प्रवेश आणि भविष्यातील शैक्षणिक प्रक्रियांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे.
APAR Card काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?
होय. आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर अनिवार्य आहे.
APAR Card CET फॉर्मसाठी अनिवार्य आहे का?
होय. नवीन CET आणि अनेक प्रवेश प्रक्रियांसाठी APAR / ABC ID आवश्यक आहे.
10वी / 12वी चे विद्यार्थी APAR Card काढू शकतात का?
होय. शाळा, कॉलेज, डिप्लोमा, डिग्री – सर्व विद्यार्थी APAR Card काढू शकतात.
चुकीची माहिती भरली गेली तर दुरुस्ती करता येते का?
होय. DigiLocker प्रोफाइल अपडेट करून माहिती दुरुस्त करता येते.






