PM Matru Vandana Yojana Online Apply 2026 | अर्ज कसा करायचा? | नवीन अपडेट | ₹11,000 थेट बँक खात्यात

PM Matru Vandana Yojana Online Apply 2026 ही केंद्र सरकारची गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ₹5,000 ते ₹11,000 पर्यंतची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. 2026 पासून या योजनेत अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि ऑनलाइन ट्रॅक करण्यायोग्य झाली आहे.


Table of Contents

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 (PM Matru Vandana Yojana Online Apply 2026) म्हणजे काय?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही गर्भवती महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पोषणासाठी दिली जाणारी आर्थिक मदत योजना आहे. पहिल्या अपत्यासाठी तसेच दुसऱ्या अपत्यासाठी (जर दुसरे अपत्य मुलगी असेल तर) या योजनेचा लाभ दिला जातो.


PMMVY 2.0 अंतर्गत मिळणारा लाभ

  • पहिल्या अपत्यासाठी : ₹5,000
  • दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी असल्यास) : ₹6,000
  • एकूण संभाव्य लाभ : ₹11,000 पर्यंत

ही रक्कम टप्प्याटप्प्याने थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते.


2026 मधील नवीन अपडेट्स

  • अर्ज स्टेटस ट्रॅक करण्यासाठी नवीन Track Application पर्याय
  • पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया
  • MCP कार्ड व कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य
  • मोबाइल OTP आधारित लॉगिन सिस्टम

कोणत्या महिला अर्ज करू शकतात? (पात्रता)

खालीलपैकी कोणताही एक निकष पूर्ण असल्यास महिला पात्र ठरते:

  • वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी
  • BPL / AAY / NFSA अंतर्गत रेशन कार्ड
  • मनरेगा जॉब कार्ड
  • ई-श्रम कार्ड
  • PM किसान सन्मान निधी लाभार्थी
  • 40% पेक्षा जास्त दिव्यांग
  • आशा / ANM कार्यकर्त्या

⚠️ केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.


आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते तपशील
  • MCP (मातृ व बाल संरक्षण) कार्ड
  • पात्रतेचा पुरावा (रेशन कार्ड / ई-श्रम / मनरेगा इ.)
  • मोबाईल नंबर

PM Matru Vandana Yojana Online Apply 2026 कसं करायचं ?

Step 1: अधिकृत वेबसाइट उघडा

ब्राउझरमध्ये सर्च करा:
“प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0” किंवा “PMMVY 2.0

पहिली अधिकृत वेबसाइट ओपन करा.


Step 2: Applicant Login करा

  • “Applicant Login” बटणावर क्लिक करा
  • मोबाईल नंबर टाका
  • Verify वर क्लिक करा
  • OTP टाकून लॉगिन करा

Step 3: नवीन रजिस्ट्रेशन

  • अर्जदार महिलेचे नाव
  • राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव
  • ग्रामीण / शहरी भाग निवडा
  • अर्ज कोण भरत आहे (Self / Husband / Family Member)
  • Create Account वर क्लिक करा

Step 4: Beneficiary Registration Form भरा

  • सरकारी कर्मचारी आहे का? (होय/नाही)
  • पहिलं अपत्य / दुसरं अपत्य (मुलगी)
  • जिवंत अपत्यांची संख्या
  • आधार तपशील व जन्मतारीख
  • वर्ग (SC/ST/OBC/General)

Step 5: पात्रतेचा पुरावा अपलोड करा

  • रेशन कार्ड / ई-श्रम / मनरेगा यापैकी एक निवडा
  • डॉक्युमेंट नंबर टाका
  • डॉक्युमेंट अपलोड करा

Step 6: MCP कार्ड माहिती भरा

  • MCP कार्ड रजिस्ट्रेशन नंबर
  • रजिस्ट्रेशन तारीख
  • MCP कार्ड अपलोड करा
  • LMP तारीख
  • तपासणी (Check-up) तारीखा

Step 7: बाळ जन्म माहिती (लागू असल्यास)

  • बाळाचा जन्म झाला असल्यास तारीख
  • मुलगा / मुलगी निवडा
  • जन्मस्थान (सरकारी / खाजगी हॉस्पिटल / घर)

Step 8: पत्ता व अंगणवाडी निवडा

  • घर क्रमांक, गल्लीत नाव, पिनकोड
  • योग्य अंगणवाडी केंद्र निवडा

Step 9: फॉर्म सबमिट करा

  • सर्व माहिती तपासा
  • Submit बटणावर क्लिक करा
  • Reference Number जतन करा

अर्ज स्टेटस कसा तपासायचा?

  • वेबसाइटवर Track Application पर्यायावर क्लिक करा
  • Application Number किंवा Registered Mobile Number टाका
  • अर्जाची सद्यस्थिती पहा

पैसे कधी मिळतात?

  • अर्ज मंजूर झाल्यानंतर
  • अंगणवाडी व जिल्हा कार्यालय पडताळणी
  • DBT द्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
  • Reference Number सुरक्षित ठेवा

निष्कर्ष

PM Matru Vandana Yojana Online Apply 2026 ही गर्भवती महिलांसाठी आर्थिक व आरोग्यदृष्ट्या अत्यंत उपयुक्त योजना आहे. जर तुम्ही पात्र असाल तर ₹11,000 पर्यंतचा लाभ मिळवण्यासाठी आजच अर्ज करा.

मित्रांनो, तुम्हाला PM Matru Vandana Yojana Online Apply 2026  बद्दल दिलेली माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. PM Matru Vandana Yojana Online Apply 2026 लेखाबाबत तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, अशा सरकारी योजनांशी संबंधित अपडेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://yojanaparichay.com/ या वेबसाइटला भेट देत रहा.

👉 संपूर्ण अर्ज प्रक्रिया व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.

जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0९ (PM Matru Vandana Yojana Online Apply 2026)म्हणजे काय?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 ही केंद्र सरकारची योजना असून गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते. या योजनेतून पात्र महिलांना ₹5,000 ते ₹11,000 पर्यंतचा लाभ थेट बँक खात्यात दिला जातो.

PM Matru Vandana Yojana Online Apply 2026 अंतर्गत किती पैसे मिळतात?

पहिल्या अपत्यासाठी ₹5,000 आणि दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी असल्यास) ₹6,000 अशी एकूण ₹11,000 पर्यंतची मदत मिळू शकते.

PM Matru Vandana Yojana 2.0 साठी कोण पात्र आहे?

ज्या महिला गर्भवती आहेत किंवा स्तनपान करत आहेत आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी आहे, तसेच ज्यांच्याकडे BPL/AAY रेशन कार्ड, ई-श्रम कार्ड, मनरेगा जॉब कार्ड किंवा PM किसान पात्रता आहे त्या महिला अर्ज करू शकतात.

MCP कार्ड म्हणजे काय?

MCP (मातृ व बाल संरक्षण) कार्ड हे अंगणवाडी किंवा आरोग्य केंद्रातून दिले जाते. यामध्ये गर्भधारणा, तपासणी आणि लसीकरणाची माहिती असते.

पैसे कधी बँक खात्यात जमा होतात?

अर्ज मंजूर झाल्यानंतर अंगणवाडी व जिल्हा कार्यालयाकडून पडताळणी होते आणि त्यानंतर DBT द्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.

चुकीची माहिती दिल्यास काय होते?

अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो किंवा पेमेंट थांबवले जाऊ शकते.

Leave a comment