Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 : भारतामध्ये आजही अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधनाचा वापर केला जातो. यामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो तसेच पर्यावरणालाही हानी पोहोचते. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana) सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाते. त्यामुळे महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर मिळते आणि त्यांचा वेळ, आरोग्य व ऊर्जा वाचते.
या लेखात आपण Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 ची संपूर्ण माहिती – पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, लाभ व ताज्या अपडेट्स पाहणार आहोत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ केला. सुरुवातीला ही योजना फक्त बीपीएल (Below Poverty Line) कुटुंबांसाठी होती, पण नंतर तिचा विस्तार करून आणखी अनेक कुटुंबांना यामध्ये समाविष्ट केले गेले.
👉 Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत LPG गॅस कनेक्शन, गॅस सिलिंडर आणि गॅस स्टोव्ह दिला जातो.
Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 चे उद्दिष्ट
- ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब कुटुंबांना धूरमुक्त स्वयंपाकघर उपलब्ध करून देणे.
- महिलांच्या आरोग्याचे रक्षण करणे.
- पर्यावरणाचे संवर्धन करणे.
- ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे.
- घरगुती कामांमध्ये आधुनिकतेकडे वाटचाल करणे.
Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 पात्रता (Eligibility)
या योजनेसाठी खालील पात्रता आवश्यक आहे:
- अर्जदार महिला असावी.
- वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- कुटुंब बीपीएल (Below Poverty Line) यादीत असावे.
- अर्जदाराकडे आधीपासून LPG कनेक्शन नसावे.
- अर्जदाराचे नाव SECC-2011 डेटाबेस किंवा गरीबी रेषेखालील यादीत असावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड / बीपीएल कार्ड
- बँक खाते क्रमांक आणि पासबुक
- पत्त्याचा पुरावा (Aadhar, Voter ID, इ.)
- पासपोर्ट साईज फोटो
उज्ज्वला योजना अंतर्गत मिळणारे लाभ
- मोफत LPG गॅस कनेक्शन
- पहिला सिलिंडर मोफत
- गॅस स्टोव्ह मोफत
- मोफत रेग्युलेटर व पाईप
- ग्रामीण व शहरी महिलांसाठी सोयीस्कर सेवा
Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 अर्ज प्रक्रिया (How to Apply)
१) ऑफलाईन पद्धत:
- जवळच्या LPG वितरकाकडे (HP, BPCL, IOC) जा.
- तिथे उज्ज्वला योजना अर्ज फॉर्म मिळवा.
- फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
- कागदपत्रे जोडून वितरकाकडे सादर करा.
- तपासणी झाल्यावर तुम्हाला LPG गॅस कनेक्शन मिळेल.
२) ऑनलाईन पद्धत:
Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 अंतर्गत महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाते. या कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज अर्ज करू शकता.
१) अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या
- सर्वप्रथम https://www.pmuy.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- तिथे तुम्हाला अर्ज करण्याची लिंक दिसेल.

२) पात्रता (Eligibility Criteria) तपासा
- अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- वय किमान १८ वर्षे असावे.
- बीपीएल (BPL) कुटुंबातील नाव असावे.
- आधीपासून LPG कनेक्शन नसावे.
👉 वेबसाइटवर पात्रतेची संपूर्ण माहिती दिलेली असते. ती एकदा वाचून घ्या.
३) आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
- आधार कार्ड
- राशन कार्ड / BPL कार्ड
- पत्त्याचा पुरावा (Aadhar / Voter ID)
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
४) “Apply for PMUY Connection” वर क्लिक करा
- वेबसाइटवर उजव्या बाजूला असलेल्या Apply for PMUY Connection या पर्यायावर क्लिक करा.
- इथे तुम्ही तीनपैकी कोणत्याही गॅस कंपनीसाठी अर्ज करू शकता:
- HP Gas
- Bharat Gas
- Indane Gas

५) कनेक्शन प्रकार निवडा
- फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला Connection Type विचारले जाईल.
- त्यात “Ujjwala Beneficiary Connection” हा पर्याय निवडा.
- डिक्लेरेशन स्वीकारा (Accept Declaration).

६) गॅस डिस्ट्रीब्युटर निवडा
- पुढे तुम्हाला तुमचा गॅस वितरक (Distributor) निवडावा लागेल.
- शोधण्याचे दोन पर्याय आहेत:
- नावाने (Name wise)
- ठिकाणानुसार (Location wise)
- तुमचे राज्य (State), जिल्हा (District) सिलेक्ट करा.
- त्यानंतर डिस्ट्रीब्युटरची माहिती (पत्ता आणि संपर्क क्रमांक) दिसेल.
७) e-KYC प्रक्रिया
- Aadhaar based e-KYC पूर्ण करावी लागेल.
- महिला अर्जदाराचा आधार नंबर टाका.
- आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
- OTP जनरेट करून सत्यापन (Verification) करा.
- तुमचा पत्ता आधारवरून ऑटोमॅटिक येईल.
८) वैयक्तिक माहिती भरा
- अर्जदाराचे पूर्ण नाव टाका.
- लिंग (Miss/Mrs) निवडा.
- जातीची माहिती (SC/ST/OBC/Other) द्या.
- राशन कार्डची माहिती (Issue Date, SRC Number) भरा.

९) बँक खाते तपशील भरा
- IFSC Code टाका व कन्फर्म करा.
- बँक खाते क्रमांक टाका.
- खातेदाराचे नाव (महिलेचे नाव) जसे पासबुकवर आहे तसेच टाका.
१०) गॅस कनेक्शनचा प्रकार निवडा
- १४.२ किलो (Single Bottle) किंवा
- ५ किलो (Single / Double Bottle) सिलेंडर पर्याय निवडू शकता.
११) कागदपत्रे अपलोड करा
- बहुतांश माहिती आधारवरून ऑटोमॅटिक घेतली जाते.
- तुम्हाला फक्त Ration Card अपलोड करावा लागतो.
- जर राशन कार्ड नसेल तर Self Declaration Form (Annexure) अपलोड करा.
१२) कुटुंबातील सदस्यांची माहिती द्या
- रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची नावे टाका.
- नाते (आई, वडील, पती, मुलगा, मुलगी) नमूद करा.
१३) फॉर्म सबमिट करा
- डिक्लेरेशन Accept करा.
- Submit वर क्लिक करा.
- तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर तुम्हाला एक Application ID मिळेल.
१४) कागदपत्रे वितरकाकडे जमा करा
- मिळालेली Application ID आणि मूळ कागदपत्रे घेऊन जवळच्या LPG Distributor कडे जा.
- तिथे पडताळणी झाल्यावर तुम्हाला गॅस कनेक्शन मंजूर केले जाईल.
✅ अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत मोफत LPG गॅस कनेक्शन मिळवू शकता.
उज्ज्वला योजना 2025 मधील नवे बदल
- सरकारने या योजनेचा विस्तार करून आणखी २५ लाख मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली आहे.
- सबसिडी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- लाभार्थ्यांना वार्षिक १२ पर्यंत सबसिडी सिलिंडर मिळू शकतात.
निष्कर्ष
Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 ही ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबांसाठी वरदान ठरली आहे. महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर मिळाल्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते, वेळ वाचतो आणि आधुनिकतेकडे वाटचाल होते.
👉 जर तुमच्या घरात अजूनही गॅस कनेक्शन नसेल, तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.
मित्रांनो, तुम्हाला Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 बद्दल दिलेली माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता.Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 लेखाबाबत तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, अशा सरकारी योजनांशी संबंधित अपडेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://yojanaparichay.com/ या वेबसाइटला भेट देत रहा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Pradhanmantri Ujjwala Yojana 2025 म्हणजे काय?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 ही केंद्र सरकारची योजना आहे ज्याद्वारे गरीब आणि BPL कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाते. यामध्ये महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध करून दिले जाते.
अर्ज सबमिट केल्यानंतर पुढे काय करावे?
Application ID सुरक्षित ठेवा.
मूळ कागदपत्रे Distributor कडे पोहचवा.
Distributor पडताळणी केल्यानंतर LPG कनेक्शन मिळेल.
बँक खाते गरजेचे का आहे?
LPG सबसिडी थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे बँक खात्यात जमा केली जाते.
म्हणून अर्जदाराचे खाते बँकेत असणे आवश्यक आहे.
Self Declaration Form कधी लागतो?
जर तुमच्याकडे Ration Card नसेल, तर तुम्हाला Family Composition / Annexure फॉर्म अपलोड करावा लागतो.
हा फॉर्म PDF / Word फाइल म्हणून डाउनलोड करून भरावा लागतो.
अर्ज ऑनलाइन पूर्ण केल्यानंतर किती दिवसांत LPG कनेक्शन मिळते?
साधारणतः 15-30 दिवसांत Distributor पडताळणी करून कनेक्शन मिळते.
पात्रतेची पडताळणी आणि डॉक्युमेंट्स तपासणीसाठी Distributor कडे वेळ लागू शकतो.
LPG साठी कोणत्या वजनाचे सिलेंडर उपलब्ध आहे?
14.2 किलो सिंगल बॉटल
5 किलो सिंगल/डबल बॉटल (स्थानिक Distributor वर अवलंबून)
अर्जासाठी काही शुल्क आहे का?
नाही, अर्ज मोफत आहे.
सिलेंडरच्या पहिल्या सबसिडी कनेक्शनसाठी सरकार पैसे देते.