Last Updated on 04/12/2025 by yojanaparichay.com
Crop Protection Machine : शेतकऱ्यांसाठी प्राण्यांपासून पीक वाचवणे ही मोठी समस्या आहे. वन्य जनावरे, नीलगाय, रानडुक्कर यांचा त्रास जास्त असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. या समस्येवर उपाय म्हणून सरकार सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक जैवध्वनी उपकरण (Solar Bio-acoustic Device) यासाठी अनुदान देते.
Crop Protection Machine Yojana या लेखात आपण अर्ज प्रक्रिया, पात्रता, अनुदान रक्कम, दोन प्रकारचे ऑप्शन, प्रोफाइल 100% कसे पूर्ण करायचे, पेमेंट प्रक्रिया आणि अर्ज सबमिशन याबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत.
✓ सौर प्राणी प्रतिबंधक जैवध्वनी उपकरण म्हणजे काय?
हे उपकरण सौर ऊर्जेवर चालते. यामध्ये जैवध्वनी (Bio-acoustic) आवाज निर्माण करणारी प्रणाली असते ज्यामुळे प्राणी आवाज ऐकून शेतात येत नाहीत.
✔ 90% ते 95% पर्यंत प्राणी शेतात प्रवेश करणे टळते
✔ सतत लाईटची गरज नाही
✔ सोलर पॅनलमुळे बॅटरी स्वतः चार्ज होते
Crop Protection Machine योजना अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
Step 1 : प्रोफाईल लॉगिन करा
- MahaDBT Farmer Portal वेबसाइटवर भेट द्या
- वेबसाइटवर लॉगिन करण्यासाठी मोबाइल OTP व्हेरिफाय करा.
- OTP Verify केल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल.
- OK बटन दाबा.

Step 2 : प्रोफाईल 100% पूर्ण करा
प्रोफाईलमध्ये 100% संपूर्णता दिसली पाहिजे.
जर पूर्ण नसेल तर
➡ “जात श्रेणी”
➡ “अपंगत्व”
ही माहिती भरून Save करा.
प्रोफाईल 100% झाल्यानंतर पुढचे पर्याय खुल्या होतात.
Step 3 : “घटकासाठी अर्ज करा” वर क्लिक करा
- होम पेजवर “घटकासाठी अर्ज करा” (Apply for Component) निवडा.
Step 4 : भाषा मराठी करा
काही वेळेस भाषा English दिसते.
- वरच्या कोपऱ्यातील “मराठी” भाषा सिलेक्ट करा.
Step 5 : कृषी यंत्रीकीकरण निवडा
- कृषी यंत्रिकीकरण बाबी निवडा → क्लिक करा
- मुख्य घटक उघडा
- कृषी अवजारच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य निवडा
- तपशील (Details) → क्लिक करा

Step 6 : वैशिष्ट्यपूर्ण अवजारे निवडा
येथे अनेक पर्याय दाखवले जातात.
- यंत्रसामग्री / अवजारे / उपकरणे → क्लिक करा
खाली दोन महत्त्वाचे पर्याय दिसतात:
1) सौर ऊर्जेवर चालणारे जैवध्वनी उपकरण – सोलर पॅनल शिवाय
✔ सबसिडी : ₹25,000
2) सौर ऊर्जेवर चालणारे जैवध्वनी उपकरण – सोलर पॅनल सह
✔ सबसिडी : ₹35,000

कोणता पर्याय निवडावा?
सोलर पॅनल शिवाय (₹25,000 अनुदान)
- स्वतःकडे पॅनल असल्यास
- वेगळा उर्जास्त्रोत असल्यास
सोलर पॅनल सह (₹35,000 अनुदान) — शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय
✔ लाईट/बिजलीची गरज नाही
✔ बॅटरी स्वतः चार्ज होते
✔ कमी देखभाल
✔ वापरात सोपे
उपकरणाची बाजारात किंमत 30–25 हजारांच्या आत मिळते, त्यामुळे
👉 शेतकऱ्यांना फक्त 5–6 हजार रूपये खर्च येतो
👉 म्हणून याला 100% अनुदान असे म्हटले जाते
Step 7 : पर्याय सिलेक्ट करून “जतन करा”
- तुमचा पर्याय निवडा
- जतन (Save) बटन क्लिक करा
- “YES/NO” विचारले तर आवश्यकतेनुसार निवडा
त्यानंतर तुम्ही होमपेजवर परत याल.
Step 8 : अर्ज सबमिट करा
- होमपेज → अर्ज सादर करा
- OK बटन दाबा
- निवडलेला अर्ज दिसेल
- बॉक्सला ✔ करा → अर्ज सादर करा
जर तुम्ही याच वर्षात पहिल्यांदा अर्ज करत असाल तर:
पेमेंट करावे लागेल : ₹23.60
- UPI
- Debit Card
- QR Code
या पर्यायांनी पेमेंट करू शकता.
(जर आधी अर्ज केलेला असेल तर पेमेंट लागत नाही.)
Crop Protection Machine Yojana अर्ज सबमिट झाल्यानंतर काय होते?
✔ अर्ज “छाननी अंतर्गत” (Under Scrutiny) दाखवला जातो
याचा अर्थ तुमचा अर्ज तपासणीसाठी गेला आहे.
✔ मंजुरी मिळाल्यावर Document Upload याच पेजवर दिसेल
- आधार
- सातबारा
- बँक खाते
इत्यादी कागदपत्रे अपलोड करायची असतात.
Crop Protection Machine Yojana पावती (Receipt) कशी तपासाल?
पावती पाहण्यासाठी
➡ लागू केलेले घटक (Applied Components) → क्लिक करा
➡ पावती पहा → PDF ओपन होईल
यात
- अर्ज क्रमांक
- शेतकऱ्याची माहिती
- सबसिडी प्रकार
सर्व तपशील दिसतात.

उपकरणाचा फायदा काय?
✔ प्राण्यांचे शेतात येणे 90–95% कमी होते
✔ सौर ऊर्जेमुळे विद्युत खर्च शून्य
✔ पीकनुकसान टळते
✔ वापरण्यास सोपे
✔ हलके आणि टिकाऊ
निष्कर्ष
सरकारकडून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे जैवध्वनी प्राणी प्रतिबंधक उपकरण खरेदीसाठी मोठे अनुदान मिळत आहे. ₹35,000 पर्यंत सबसिडी मिळत असल्याने हे उपकरण कमी किमतीत मिळते. अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि ऑनलाइन करता येते.
शेताचे संरक्षण, आर्थिक बचत आणि सोयीस्कर वापर यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे.
मित्रांनो, तुम्हाला Crop Protection Machine Yojana 2025 बद्दल दिलेली माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. Crop Protection Machine Yojana लेखाबाबत तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, अशा सरकारी योजनांशी संबंधित अपडेट माहिती मिळवण्यासाठी आमच्या https://yojanaparichay.com/ या वेबसाइटला भेट देत रहा.
Crop Protection Machine Yojana सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक जैवध्वनी उपकरण म्हणजे काय?
हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे सोलर पॅनलवर चालते आणि प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी जैवध्वनी आवाज तयार करते. या आवाजांमुळे नीलगाय, रानडुक्कर, ससा, हरीण इत्यादी प्राणी शेतात येत नाहीत.
या उपकरणासाठी सरकारकडून किती अनुदान मिळते?
या उपकरणासाठी दोन प्रकारे अनुदान मिळते:
सोलर पॅनल शिवाय: ₹25,000
सोलर पॅनल सह: ₹35,000
बहुतेक शेतकरी सोलर सह असलेला सेट निवडतात कारण त्यात संपूर्ण प्रणाली मिळते.
हे उपकरण प्राण्यांना किती टक्के थांबवते?
सरासरी 90% ते 95% पर्यंत प्राण्यांना शेतात येण्यापासून रोखते. आवाजांची फ्रीक्वेन्सी बदलत असल्यामुळे प्राणी त्याला सरावत नाहीत.
उपकरण दिवसभर चालते का?
हे उपकरण सौर ऊर्जेने दिवसा चार्ज होते आणि रात्री 10–12 तास सतत काम करते. पावसाळ्यातही योग्य प्रकारे चार्ज होते (काही मॉडेल्समध्ये बॅकअप बॅटरी असते).
हे उपकरण पावसात चालते का?
होय. बहुतेक उपकरणे वॉटरप्रूफ असतात आणि पावसाळ्यातही व्यवस्थित काम करतात.
